संजय राऊतांचे थेट पंतप्रधान मोदींना आवाहन !
दै. बातमीदार । २७ फेब्रुवारी २०२३ । कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक आवाहन केले आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कर्नाटक दौरे वाढले आहेत. आज नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीच संबंधित राज्यांच्या मातृभाषेतून करतात. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि बेळगाव हे महाराष्ट्राचेच असल्यामुळे बेळगावात मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करावी, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले आहे.
मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल ! कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल.पहा जमतंय का!
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 27, 2023
संजय राऊत यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, ‘मोदीजी ज्या राज्यात जातात तिथे ते स्थानिक भाषेत भाषणाला सुरूवात करतात. आज मराठी भाषा गौरव दिनी, पंतप्रधान बेळगावात आहेत. त्यामुळे बेळगावात मराठीत भाषणाला सुरुवात करून त्यांनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर मराठी जनांना अभिमान वाटेल! आणि कर्नाटक सरकारला एक कडक संदेश जाईल. पहा जमतंय का!’
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम