जागा वाटपावर संजय राऊतांचा खुलासा !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ मे २०२३ | राज्यातील आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारी करीत आहे. पण राज्यातील जनतेचे जास्त लक्ष महाविकास आघाडीकडे आहे. यांच्या सुरु असलेला वाद व जागा वाटपाबाबत तिढा कसा सुटणार हे मात्र येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यात जागावाटपाची चर्चा होईल. आमचा १९ चा आकडा कायम आहे. आम्ही या जागा जिंकलेल्या आहेत असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या १९ जागा जिंकून आम्ही आलो आहोत. त्यातील काही सोडून गेले पण जागावाटप करताना तिन्ही पक्षात समन्वय साधताना काहीठिकाणी तडजोडी कराव्या लागतील, तोडगा काढावा लागतील हे सत्य आहे. तडजोडीचा फायदा भाजपाला मिळणार नाही. महाविकास आघाडी मजबूत आहे. १९ आकडा कायम राहील. महाराष्ट्रात शिवसेना १९ आकडा कायम ठेवेल, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रमुख नेत्यांची बैठक होईल त्यात निर्णय होईल असं त्यांनी म्हटलं.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ का करताय? मुंबई, ठाण्यासह १४ महापालिका निवडणुका घ्या, मोदींना प्रचाराला आणा, कुणालाही प्रचाराला आणावे, निवडणुका घ्या, जनमत कुणाच्या बाजूने आहे हे कळेल असा इशाराही राऊतांनी भाजपाला दिला आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून दबाव टाकला जातो. आम्ही लढाई लढत आहोत. जयंत पाटील खंबीरपणे तपासाला सामोरे जातायेत. राजकीय दबावाचे हे षडयंत्र आहे. काही गोष्टी आम्ही करत नाही, मान्य करत नाही त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून गुडघे टेकवायला लावतात. पण आम्ही ते करत नाही. २०२४ नंतर ईडीच्या कारवाईला कुणाला पाठवायचे आणि किती तास बसवायचे याची यादी आम्ही तयार करत आहोत असंही संजय राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम