भाजपवर संजय राऊतांचा गंभीर आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १९ ऑक्टोबर २०२३

जगातील इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत असतांना या युद्धामुळे मृतांची संख्या वाढत असून जागतिक नेत्यांनीही यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या युद्धामुळे जग दोन भगांमध्ये विभागला गेला आहे. काही देशांनी इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी पॅलेस्टाईन देशाची बाजू घेतली आहे. दरम्यान, भारतात मात्र केंद्र सरकारने इस्रायलच्या भूमिका घेतली असली तरीही विरोधकांनी मात्र पॅलेस्टाईनची बाजू लावून धरली आहे. शरद पवारांनीही काल १८ ऑक्टोबर पॅलेस्टाईनची बाजू घेतल्याने भाजपातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय.

संजय राऊत म्हणाले की, “जगात काय चाललंय याची जाणीव लोकांना नाहीय. आसामचे मुख्यमंत्री एके काळी काँग्रेसचे सल्लागार होते. कोणाला हमासमध्ये पाठवयाचं आणि कोणाला अल कायदामध्ये हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत. आधी देशाला वाचवा. अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका आधी समजून घ्या. विश्वगुरु नरेंद्र मोदींना बनवलं आहे, परंतु पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयीपर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात देशाची भूमिका राहिली आहे. सरकारे बदलली पण भूमिका बदलली नाही”, असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम