
अक्षय तृतीयेवर सराफ व्यावसायिकांना बसणार फटका !
दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ । हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्व दिले आहे. त्यामुळे अनेक लोक या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे.
अक्षय्य तृतीयेला साेने खरेदी अतिशय शुभ मानली जाते. अनेक जण या दिवशी क्षमतेनुसार साेने खरेदी करतात. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेले साेन्याचे दर ग्राहकांचा हिरमाेड हाेउ शकताे.
सध्या साेन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. मात्र, दर वाढलेलेच असल्यामुळे त्याचा मागणीवर परिणाम हाेउ शकताे. दर कमी झाल्यास विक्री वाढू शकते, असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक खरेदी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हाेणाऱ्या उलाढालीत दक्षिण भारतीय राज्यांचा वाटा ४० टक्के राहताे. पश्चिम भारतात हे प्रमाण २५ टक्के तर पूर्वेकडे २० टक्के आहे. उत्तर भारतात १५ टक्के उलाढाल हाेते.
आवश्यक असेल तरच खरेदी
देशातील बहुतांश भागात सध्या साेन्याचा ६० हजार रुपये ताेळा एवढा दर आहे. भाव वाढल्यामुळे सध्या अत्यावश्यक असेल तरच साेने खरेदी करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम