
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट !
दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ । राज्यातील राजकारणात गेल्या आठवड्यापासून वेग आला आहे. आता पुन्हा एकदा आज राष्ट्रवादी पक्षाचे मार्गदर्शन शिबीर पार पडणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे.
गुरुवारी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचले आहेत. अदानी यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी उदय सामंत हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. नाट्य परिषदेच्या निवडणुकीबद्ल सामंत यांनी पवारांची भेट घेतली असल्याचे सांगतिले. यावेळी नाट्य परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. इतर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व मंत्र्यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व मंत्री मुंबईच्या दिशेने रवाना जाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या घाटकोपरमध्ये ‘कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर 2023’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राज्यभरातून दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम