कुपोषणरूपी सैतानाचे थैमान; शेकडो बालकांचा गेला बळी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । कुपोषणरुपी सैतानाच्या तावडीत सापडलेल्या मेळघाट येथे मागील पाच महिन्यांत शेकडो बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या या माहितीनुसार, दिवसागणिक मेळघाट येथे बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, मागच्या पाच महिन्यांत शून्य ते सहा महिने वयोगटातील ७७ बालके मृत पावली तर ३३ बालके मृतावस्थेत जन्मास आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात धारणी उपजिल्हा रुग्णालयातच एकूण ३६ पैकी १९ बालकांसह दोन गर्भवती माताही मरण पावल्या आहेत.

कुपोषणाचे वाढते प्रमाण, बालकांचे व मातांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्यसरकार विविध उपाययोजना करत असूनही ही स्तिथी बदलत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम