मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा; नागरिकांची भंबेरी उडाली

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । दारूच्या नशेत झिंगाट झालेला व्यक्ती केव्हा, काय करेल काही सांगता येत नाही. औरंगाबाद येथील सिडको भागातील या घटनेत एका मद्यधुंद व्यक्तीने दारू पिऊन धुमाकूळ घातल्याने नागरिकांची भंबेरी उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि.२०) च्या सायंकाळी सिडको कार्यालयाच्या समोर राजू जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) हा इसम रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांसह मुलांना, महिलांना दगड फेकून मारत होता. यात जाधवने एन १ चौकात वर्षा डोंगरे या महिलेस मारहाण केली.

नंतर तो सिडको उड्डाणपुलाच्या दिशेने धावत आला व तेथेही येतांना दगडफेक केली. यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या लोकांनी मद्यपी जाधव यास वसंतराव नाईक महाविद्यालयानजीक धरले व त्याची यथेच्छ धुलाई केली.

दरम्यान, पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या जाधव विरोधात ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले, रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम