जळगावमध्ये सावरकर जयंती उत्साहात साजरी
जळगाव – 28 मे 2024 रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती वीर सावरकर रिक्षा युनियनचे संस्थापक व जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहाने साजरी करण्यात आली. रिक्षा युनियनच्या कार्यालयातून सर्व रिक्षा चालक-मालक व शहरातील नागरिकांच्या सहभागाने रॅली काढण्यात आली. फुले मार्केट, दादा वाडी, खोटेनगर, अग्रवाल, आकाशवाणी, इच्छादेवी, कुसुंबा यांसारख्या अनेक रिक्षा स्टॉपचे चालक, मालक आणि विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जळगाव आरटीओ गणेश पिंगळे, अँड. शुभंकर अत्रे, सुखदेवकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साळुंखे, सुप्रिमचे श्याम पाटील, जिल्हा अपंग समितीचे अध्यक्ष भरत जाधव, समाजसेवक वाल्मिक सपकाळे आणि रमेश पहलानी हे प्रमुख पाहुणे होते.
कार्यक्रमाची सुरुवात रिक्षा युनियनच्या कार्यालय परिसरात रिक्षा लावून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अँड. शुभंकर अत्रे यांनी वीर सावरकरांचा जीवनप्रवास आणि निजामशाहीविरुद्धच्या संघर्षावर भाष्य केले. आरटीओ गणेश पिंगळे यांनी आरटीओच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आणि सावरकरांचे लिखाण वाचनालय सुरू करण्याचे आश्वासन दिले. स्वातंत्र्य चौकापर्यंत रॅली काढण्यात आली आणि सावरकरांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करण्यात आले.
दिलीप सपकाळे यांनी युनियनच्या माध्यमातून केलेल्या कामांची माहिती दिली आणि रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील असे नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन आदिवासी आश्रम शाळेचे शिक्षक महेश यांनी केले तर आभार पोपट ढोबळे यांनी मानले. ललित कानडे, रमेश ठाकूर, संजय मराठे आणि इतर सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम