सावता माळी पुण्यतिथी निमित्त माजी आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण
किनगाव परिसरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सावता माळी पुण्यतिथी निमित्त माजी आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण
किनगाव परिसरातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
यावल l प्रतिनिधी
संत सावता माळी यांची पुण्यतिथी निमित्त किनगांव ता. यावल येथे माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी संत सावता माळी यांच्या प्रतीमेला अभिवादन केले.
यावेळी उपस्थित समाज बांधवांना महाराजांचा जीवनपट उलगडला तसेच चोपडा मतदारसंघातील विकास कामांबाबत सविस्तर माहिती दिली.
शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी किनगाव ता. यावल येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त समाज बांधवांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यावेळी त्यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी आ. सोनवणे यांनी समाज बांधवांना संबोधित करतांना संत सावता माळी यांच्या बद्दल महती सांगितली तसेच चोपडा व यावल तालुक्यातील विकास कामांची सविस्तर माहिती दिली.
तसेच माळी समाज बांधवाच्या कोणत्याही समस्या असोत त्या सोडविण्यासाठी कटिबद्घ राहील असे आश्वासन दिले. माळी समाज एकजुटीने काम करतात हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी बबलू भाऊ कोळी (उप सभापती कृ. उ.बा.समिती यावल), सूर्यभान पाटील सर (संचालक कृ.उ.बा.समिती यावल), जनार्धन महाजन, प्रमोद महाजन (अध्यक्ष ), सौ. भारती पाटील सरपंच, एकनाथ महाजन,
महेंद्र महाजन, प्रवीण महाजन, रमेश महाजन, प्रशांत पाटील, सुधाकर पाटील, नीलकंठ पाटील, नथू महाजन (सर), रोहिदास महाजन, रघुनाथ महाजन, श्रावण कोळी, दिलीप माळी, शांताराम कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम