मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री : १ तारखेपासून दर वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक मद्यप्रेमींना आता आर्थिक खर्चात टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील बार, लाउंज आणि कॅफेमध्ये दिलं जाणारं मद्य महागणार आहे. त्यामुळे येथे बसून मद्य पिणाऱ्या व्यक्तींना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. १ नोव्हेंबरपासून राज्यात दारू महागणार असून राज्य सरकारने VAT मध्ये ५ टक्क्यांनी वाढ केलीये.

राज्य सरकारने परमिट रुम सर्व्हिसवर १ नोव्हेंबरपासून ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या आधी ५ टक्के व्हॅट आकारला जात होता. त्यात आणखी ५ टक्के वाढ केल्याने परमिट रुमवर एकूण १० टक्के व्हॅट दर आकारला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारनं परवाना शुल्कातील दरांत वाढ केली. त्यामुळे मद्यावरील दरही वाढला. अशात आता पुन्हा एकदा बार, लाउंज आणि कॅफेमधील दर वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

पंचतारांकीत हॉटेलमध्ये अधिकचा कोणताही व्हॅट आकारण्यात येणार नाही. कारण अशा हॉटेल्समध्ये आधिपासूनच २० टक्के व्हॅट आकारला जातोय. त्यामुळे पंचतारांकीत हॉटेल्सच्या दरांत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यासह ओ्व्हर- द-काउंटरवर देखील वाढीव व्हॅट आकारण्यात येणार नाहीये.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम