सीमा हैदर करणार राजकारणात एन्ट्री ; या पक्षाने दिली ऑफर !
बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ गेल्या काही महिन्यापासून देशात सीमा हैदर आणि सचिनच्या लव्हस्टोरीची मोठी चर्चा सुरु होती. पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेली 4 मुलांची आई आणि ग्रेटर नोएडाच्या राबुपुरा गावात आपल्या पबजी प्रियकरासोबत संसार करत असणारी सीमा हैदर अनेक गोष्टींमुळे चर्चेत आली आहे. अनेक ठिकाणी बातमी व्हायरल होताच, उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सीमा आणि सचिनला मदतीचा हात दिला आहे. अमित यांनी आपली चित्रपट निर्मिती संस्था जानी फायर फॉक्सच्या बॅनरखाली बनणाऱ्या एका चित्रपटात या दोघांनाही अभिनयाची ऑफर दिली आहे. आता या चर्चेनंतर सीमा सीमा हैदर करणार राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा समोर आली आहे.
सीमाच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामागे कारणही तसंच आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर मासूम यांनी सीमाला आपल्या पक्षात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सीमाची तुलना थेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी केली आहे. ‘इटलीहून आलेल्या सोनिया गांधी भारतात राजकारण करू शकतात, पंतप्रधानपदाच्या दावेदार होऊ शकतात, तर पाकिस्तानची सीमा हैदर राजकारणात का येऊ शकत नाही?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सीमा हैदर खरोखर निर्दोष असतील, त्या गुप्तहेर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत आणि त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर प्रदेश महिला विंगच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली जाऊ शकते’, असंही ते म्हणाले आहेत. तर ‘सीमा हैदर एक उत्तम वक्त्या आहेत. त्यांनी राजकारणात नशीब आजमवायला हवं’, असंही किशोर मासूम म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम