महिलांसाठी शमा केसकर ठरताहेत “रोलमॉडेल” पुरष मक्तेदारीच्या तंत्रज्ञान क्षेत्रात त्या ठरल्या राजदूत

बातमी शेअर करा...
दै. बातमीदार । ०३ ऑक्टोबर २०२२ । भारता सारख्या देशात पुरुषाच्या खांद्याला खांदा लाऊन विविध क्षेत्रात उच्च पदी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तंत्रज्ञानाच्या कसोटीत इतर देशाच्या तुलनेत अग्रक्रमावर असलेल्या अमेरिका सारख्या देशात आजही काही पदांवर पुरुषी मानसिकता आणि त्याचे वर्चस्व दिसत आहे.
 या अमेरिकेत एका उच्च स्तरीय तंत्रज्ञानातील कंपनीत भारतातील एक तरुणी महत्वाच्या मुख्य पदावर कार्यरत आहे. पुरुषी मक्तेदारीला छेद देत शमा बुटाला – केसकर यांचा सुरु असलेला प्रवास हा इतरांसाठी विशेषतः महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
 नव्या कर्तुत्वातून ध्येयाला गवसणी घालणाऱ्या या तरुणीने अमेरिका सारख्या तंत्रज्ञान अग्रेसर असलेल्या देशात कर्तुत्वाची छाप पाडली आहे. आशिया, बांगलादेश आणि पाकिस्तान मधील दक्षिण आशियाई महिलांना मार्गदर्शन करणारी ‘प्रमुख वक्ता’ आणि ‘महिला टेक ग्लोबल बेसिडर’ म्हणून शमा यांना सन्मानित करण्यात आले आहे.
शमा ह्या मुळच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातल्या असून त्यांचा जन्म पुराणमतवादी कुटुंबात झाला. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या शिक्षणाला जास्त महत्व दिले जात नाही, तेथे आई वडील पाठीशी उभे राहिले. त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण येथील कानसाई हाईस्कूल मध्येच झाले.
१९९८ साली मुंबई विद्यापीठ येथून भौतिकशास्त्र, गणित आणि शिक्षणशास्त्र या विषयांमध्ये पदवी घेतली. बालपणापासून शमा यांना अभ्यासाची गोडी होती. शालेय जीवनात हुशार असलेल्या शमा यांना त्यांच्या आई कडूनच शिक्षणाचे बाळकडू मिळाले. शमा ह्याना नाविन्याची आवड लहानपणापासूनच त्यांना होती.
नेहमीच्या मार्गावर न जाता आव्हानात्मक तंत्रज्ञान क्षेत्राची निवड केली. पुढे त्यांनी अमेरिकेत ‘माहिती प्रणाली’ या विषयात उच्च शिक्षण घेतले. अमेरिकेतून तंत्रज्ञानातील उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या इंटरनेट सर्व्हिस आणि वेब सर्व्हिस देणाऱ्या ‘याहू’ या कंपनीमध्ये नोकरीच्या शोधात होत्या. मात्र संधी उपलब्ध न झाल्याने त्यांनी तत्काळ एखादी नोकरी करणे पसंद केले.
एका क्रीडा साहित्यांच्या कंपनीत रोखपाल म्हणून पहिल्या नोकरीला सुरवात केली. काही महिने रोखपाल म्हणून नोकरी केली. पुढे नामांकित कंपनी ‘गुगल’ नोकरीची संधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती त्याना त्यांच्या मित्र मैत्रिणीकडून कळाली. चालून आलेल्या संधीचे सोनं करण्यासाठी त्यांनी कंपनीत मुलाखत दिली आणि त्यांना सॉफवेअर इंजिनीअर हे पद मिळाले.
त्यांना मिळालेल्या हुद्द्यामुळे आपले कर्तुत्व दाखवण्यासाठी अनेक मार्ग खुले झाले. त्यातच कंपनीच्या संस्थापाकासोबत मिटींगला उपस्थित राहणे, नवनवीन काम शिकण्याला मिळाले. येथे ५ वर्ष काम करत असताना अनेक नेतृत्व पदांवर काम त्यांनी केले. एखादी आज्ञावली योग्य आणि अचूक काम करत नसेल तोपर्यंत आम्ही त्याच्यावर काम करत असल्याचे शमा ह्या सांगतात.
त्यामुळे त्यांच्या कार्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी त्यांनी ‘प्रत्येक नव्या कर्तव्यासह’ हे ब्रीद वाक्य कायम लक्षात ठेवले आहे. गुगल कंपनीमध्ये काम करत असताना तेथील वातावरण हे अगदी पारदर्शक आणि चांगले होते. २००६ मध्ये शमा यांच्या सहकारी सुधा यांच्या सहकार्याने त्यांनी गुगल कंपनीच्या आवारात माउंटन व्हुय येथे भारताचा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.
 यात सांस्कृतिक कार्याक्रमचे आयोजन देखील करण्यात आले होते. असा कार्यक्रम गुगल कंपनीकडून सदर करण्याचा पहिलाच अनुभव. त्याचबरोबर भारताचा स्वातंत्र्य दिवस इतर देशात साजरा होत असल्याने शमा यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी सर्वांना अभिमान आहे.
 २०१२ मध्ये ‘नोव्हेना प्लस’ ह्या मोबाईल अॅपचा अविष्कार केला होता. मात्र अपुऱ्या अर्थसहाय्यमुळे पुढे अपयशाला सामोरे जावे लागले. लिंक इन सोबत काम करत असताना मोबाइलचा वापर कशाप्रकारे सोपे होऊं शकेल हे सुधारण्याच्या नियोजन समितीवर काम करण्याची संधी चालून आली.
यात उत्पादन अभियांत्रिकीचे माजी उपाध्यक्ष किरण प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.
दिलेले काम योग्यरित्या तपासण्याचे काम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ वायनर यांना देण्यात आले होते. त्यावेळी शमा या उत्पादन गुणवत्तेच्या प्रमुख होत्या. वायनर यांनी शमा यांच्या कामासाठी कौतुकाची थाप ठेवली.
यातून ग्राहकभिमुक काम करायची शिकवण मिळाली असल्याचे शमा सांगतात. जानेवारी २००६ मध्ये शमा यांनी स्प्रिंग सिडॉल नावाचा एक उद्योग सुरु केला. मात्र वर्षभरातच तो उद्योग बंद पडला.
वरिष्ठ गुणवत्ता अभियंता म्हणून अमेझॉन मध्ये रुजू झाल्यावर एका समितीचा भाग होण्याची संधी मिळाली. शमा ह्या एकमेव स्त्री संघ प्रामुख होत्या. मात्र त्यांना महत्वाचे निर्णय घेणाऱ्या समितीमध्ये सहभाग घेता येत नव्हता.
त्यांना त्यांचे विचार आणि निर्णयाचा मसुदा सभेत सहभागी होणाऱ्या पुरुष सभासदांना देत असायच्या. त्याचे निर्णय आणि विचार पटल्यानंतर त्यांना सभेत सहभागी होण्याची संधी चालून आली. हे यश तितकेच मोठे होते.
गुगलमध्ये काम करत असताना जाहिरात विभागात काम केले. तेव्हा ऑनलाईन काम करताना जाहिरात व्यासपीठ उपलब्ध झाले. इथूनच खऱ्या अर्थाने जाहिरात तंत्रज्ञान विभागत रस वाढू लागला. अखेर निक्लेटिक्स येथे त्या रुजू झाल्या.
अॅमेझॉन कंपनीतील कामाचा अनुभव गाठीशी घेत निक्लेटिक्स या जाहिरात कंपनीत नव्या ध्येयानिशी पदार्पण केले. २०२० मध्ये अॅमेझॉन कंपनीतील काम थांबले आणि निक्लेटिक्स कंपनीत प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यास सुरवात केली.
 नंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये त्या निक्लेटिक्समध्ये पूर्णवेळ रुजू झाल्या. सध्या त्या तंत्रज्ञान आणि अविष्कारच्या राजदूत आहेत.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम