शिंदखेडा-शिरपुर येथुन दसऱ्या मेळाव्याला हजारो शिवसैनिक जाणार : हेमंत साळुंके

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०३ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेची स्थापना होऊन जवळ जवळ 56 वर्ष झालीत. दरवर्षी सालाबादाप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होत असतो. एक पक्ष, एक नेता, एक मैदान हे समीकरण शिवसेनेच झालेले असुन 56 वर्षात फक्त दोन वेळा दसरा मेळावा रद्द झाला आहे.

एक वेळा अतिवृष्टी व दुसऱ्यांदा कोरोना महामारीमुळे. त्यामुळे यावेळीही दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल तोही पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा “न भुतो न भविष्यती” असा होणार आहे. ज्यांनी ज्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांची अवस्था काय झाली ? याचा इतिहास साक्षीदार आहे.

त्यामुळे काळजी करु नका. सत्याचाच विजय होईल. पुन्हा शिवसेना उभारी घेईल. त्यामुळे दसऱ्या मेळाव्याला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी मिळेल त्या वाहनाने मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी शिंदखेडा येथे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकारी बैठकीत सांगितले.

   यावेळी सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी, जिल्हा संघटक मंगेश पवार, जिल्हा समन्वयक डॉ.भरत राजपुत, जिल्हा युवाधिकारी आकाश कोळी, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, भरतसिंग राजपुत, उपजिल्हासंघटक कल्याण बागल, भाईदास पाटील,

 विभा जोगराणा, विधानसभा संघटक गणेश परदेशी, छोटुसिंग राजपुत, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश देसले, ईश्वर पाटील, शिरपुर तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जि.प.सदस्य छोटु पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सर्जेराव पाटील, शैलेश सोनार, विनायक पवार, डॉ.मनोज पाटील, शानाभाऊ धनगर, मनोज पवार, राजु पवार, राजु कोळी, संतोष देसले, जितेंद्र राठोड, जितेंद्र पाटील, राजु माळी, हिरालाल बोरसे, आर.आर.पाटील, संतोष माळी, चंद्रसिंग ठाकूरसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते.

यावेळी शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातुन हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार असे ठरले. यावेळी सहसंपर्कप्रमुख हिलाल अण्णा माळी यांनी दसरा मेळावा यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले. तसेच विश्वनाथ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तालुका समन्वयक विनायक पवार यांनी सुत्रसंचालन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम