ढेकूरोड पिंपळे रोड परिसरात कीटकनाशक फवारणीची मागणी… -मा.आरोग्य सभापती शाम पाटील यांचे पालिका प्रशासनाला पत्र.

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)
ढेकू रोड – पिंपळे रोड परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने सतर्क होऊन डेंग्यू सदृश्य आजारांना रोखण्यासाठी या भागात नियमित कीटकनाशक फवारणी करण्यात यावी अशी मागणी राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मा.आरोग्य सभापती शाम पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. परिसरातील खुल्या भूखंडांवर पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे डबके साचलेले असल्याने त्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते २ दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे विद्या नगर येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
या भागातील लहान मुले , जेष्ठ नागरिक – महिला यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या भागात पालिकेतर्फे नियमित कीटकनाशक फवारणी करण्यात यावी यासाठी शाम पाटील यांनी मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे…!

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम