
21 जानेवारी शनिवारी रोजी शनी महाराज यात्रास्तोव
भडगाव/प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे भडगाव शहरात शनी आमावस्या निमित्ताने भव्य यात्रास्तोव दिनांक 21 जानेवारी शनिवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील शनी चौक या भागात गिरणा नदीच्या तीरावर तालुक्यातील एकमेव असे शनी देवाचेे जुने प्राचीन मंदिर असून दरवर्षी शनीवारी येणाऱ्या आमावस्या निमित्ताने ही यात्रा भरवली जाते.
यात्रेचे मुख्य आकर्षण हे यात्रेचा मेळावा आहे . ज्या मध्ये तीन मोठे पाळणे, मौत चा कुवा, बलून घसरकुंडी, विमान पाळणे, कार पाळणे, निशानबाज खेळ, विविध खेळणीची दुकान आदी आहे.
सायंकाळी शहरातून शनी देवाच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक भजन , ढोल ताशा च्या गजरात काढली जाणार आहे
तरी सर्व नागरिकांनी शनी देवाच्या दर्शानेचा लाभ घ्यावा असे आवाहन शनेश्वर पंच मंडळाकडून करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम