शरद पवार पोहचले काँग्रेस अध्यक्षांच्या घरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा फैसला होण्यापूर्वी सध्या दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अचानक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा या ठिकाणी पोहोचल्यामुळे पडद्यामागे मोठे राजकारण घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादीच्या कारभाऱ्याच्या मुद्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यात राष्ट्रवादी पक्ष व निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला द्यायचे याचा फैसला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनसीपी अध्यक्ष शरद पवार दिल्लीत ठाण मांडून आहेत. आयोगाची सुनावणी दुपारी 4 च्या सुमारास सुरू होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्षांचे निवासस्थान गाठले आहे.

शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. त्या ठिकाणी काँग्रेस नेते राहुल गांधीही पोहोचलेत. सूत्रांच्या माहितीनुसार, खरगे यांच्या निवासस्थानी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी एखादी ठोस रणनीती ठरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जागावाटप कसे असावे, इंडिया आघाडीची रणनीती कशी असावी, यासंबंधीची चर्चा आजच्या बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे समजते. इंडिया आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. पण इंडियाच्या सभांची सुरुवात नेमकी कुठून करावी, याचा निर्णय अद्याप झाला नाही. या बैठकीत त्यावर एखादा निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रस्तुत बैठकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची नेमकी रणनीती काय असावी? यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या मुद्यावरही या बैठकीत विस्तृत खल होण्याची शक्यता आहे. कदाचित काँग्रेस हायकमांड आज शरद पवार यांच्याशी चर्चा करेल आणि त्यानतंर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना त्याची माहिती देण्यात येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम