…तर देवालाही आनंद होणार ; आ.कडू पुन्हा सरकारवर बरसले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑक्टोबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील प्रहार पक्षाचे अध्यक्ष आ.बच्चू कडू वेगवेगळ्या विधानाने चर्चेत येत असतांना आज देखील त्यांनी एक केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे.
आ.बच्चू कडू म्हणाले कि, राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभल्याने पंढरपुरच्या विठुरायाच्या महापूजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा कार्तिकी यात्रेला विठ्ठलाची होणारी शासकीय पूजा अजित पवार करणार की देवेंद्र फडणवीस? याबाबतचा निर्णय न्याय आणि विधी विभाग करणार आहे. यावरुन प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पुजेला जावे. दोन दोन उपमुख्यमंत्री शासकीय पुजेला येत आहेत, याचा देवालाही किती आनंद होईल. मी तर म्हणतो राज्याला पाच उपमुख्यमंत्री करावे आणि या पाचही उपमुख्यमंत्र्यांनी शासकीय पुजेला जावे. कारण हिंदू धर्मात पाच आकड्याला विशेष महत्त्व आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले, राज्यात पाच उपमुख्यमंत्री केल्यानंतर मुख्यमंत्रीही दोन करावेत. राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक सार्वजनिक कामांसाठी तर एक व्यक्तिगत कामांसाठी. आता व्यक्तिगत कामांसाठी एका मुख्यमंत्र्यांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झालेले अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतेच एक विधान केले. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचे असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू. जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, असे फडणवीस म्हणाले होते. यावरूनही बच्चू कडू यांनी खोचक टोला लगावला आहे. सर्वच पक्ष भाजपमध्ये विलीन करावेत, असे बच्चू कडू म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम