…म्हणून दिला होता शरद पवारांनी राजीनामा ; सुप्रिया सुळे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ ऑक्टोबर २०२३

राज्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते ते म्हणाले होते कि, सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन भाजपसोबत जायची शरद पवारांची खेळी होती, असा आरोप मंत्री भुजबळांनी केला आहे. त्याला आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचाच नव्हता. मात्र, काही नेते भाजपसोबत चला म्हणून हट्ट धरुन बसले होते. त्यामुळे शरद पवार नाराज झाले होते. या नेत्यांना कंटाळूनच शरद पवारांनी अखेर पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळांनी शरद पवारांवर जे काही आरोप केले आहेत, त्यात अनेक विसंगती आहेत. एकीकडे शरद पवारांना भाजपसोबत युती करायची होती म्हणायचे आणि दुसरीकडे शरद पवारांनी शब्द फिरवल्याने अजितदादांनी तो पाळला म्हणायचे हे विसंगत आहे. शरद पवारांना भाजपसोबत जायचे होते तर तुम्ही का शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेले?. सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादीतील अनेक नेतेच भाजपसोबत जाऊया, असा आग्रह शरद पवारांकडे करत होते. मात्र, मी काँग्रेसच्या विचारांना सोडू शकत नाही, असे शरद पवारांनी त्यांना स्पष्ट सांगितले होते. तरीही काही नेते हे ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे शरद पवार प्रचंड नाराज झाले होते. अशा नेत्यांना कंटाळूनच शरद पवारांनी अखेर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम