शरद पवारांनी राजीनामाच्या विषय संपला ; अजित पवार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  राज्यात २ मे पासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चेला उत आला होता. त्यानंतर तीन दिवसांनी हा राजीनामा पुन्हा मागे घेतल्याने चर्चा थांबल्या होत्या. पण आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी या चर्चेला सुरुवात केली आहे. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावर आज अजित पवार बोलताना म्हणाले की शरद पवार साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे.

काल शरद पवार साहेब तुमच्याशी बोलले. त्यांनी जे सांगायचं आहे ते सांगितलं. जे साहेबांचं मत आहे तेच आमचं मत आहे. त्यांनी निर्णय घेतला आहे तो सर्वाना सांगितलं आहे. त्यांच्या निर्णयाने सर्वांनी समाधान व्यक्त केलं आहे. शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे. तुम्हाला बाकी सर्व गोष्टी माहिती आहेत. साहेबांनी कार्यकर्त्यांच्या, पक्षातीन नेत्यांच्या आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. आता आम्ही पुन्हा कामाला लागलो आहे. राजीनाम्याचा विषय आता संपला आहे. तर महाविकास आघाडीला कुठलाही धक्का लागणार नाही, आम्ही एकत्र होतो एकत्र आहोत असंही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांना अजितदादा गैरहजर का? असा सवालही करण्यात आला. त्याबाबत बोलताना शरद पवार यांनी अजितदादांची बाजू सावरून घेत म्हणाले होते की, ‘पत्रकार परिषदेत सगळे असतात काय? हे आमचे बाकीचे सहकारी आहेत.. त्यांचंही मला आश्चर्य वाटतं. कारण सहसहसा पत्रकार परिषदेमध्ये पक्षातील नेतृत्वाची फळी कधी बसत नाही.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम