चादर, उशी देणार तुम्हाला ‘या’ आजाराची लक्षण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ ।  प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्याची नेहमीच निगा राखत असतो. पण एका आजाराचे नाव जरी घेतल तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. अतिशय धोकादायक आणि जीवघेणा हा रोग माणसाचा शरीराचा खुळखुळा बनतो. कॅन्सरला कुठल्या वयात, कोणाला आणि कसा होतो हे कोणालाही सांगता येतं नाही. विशेष म्हणजे कॅन्सरची लक्षणं दिसत नाही. त्यामुळे आपल्याला या जीवघेण्या आजाराने गाठलं आहे हे सर्वसामान्य व्यक्तीला कळतं नाही. धक्कादायक म्हणजे जोपर्यंत आपण काही आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांकडे जातो तोपर्यंत उशीर झालेला असतो. म्हणून म्हणतात की, वर्षातून एकदा तरी आपल्या नियमित आरोग्य चाचणी करणं गरजेचं आहे. खास करुन 40 नंतर महिला आणि पुरुषांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

कर्करोग हा उपाचर घेऊनही बरा होतं नाही, यात अनेकांचा जीव जातो. त्यामुळे डॉक्टर आणि कर्करोग निदान तज्ज्ञ शरीरात होणाऱ्या सर्व लक्षणांवर आणि संकेतांवर लक्ष ठेवून त्वरित निदान, उपचार घेण्यास सांगतात. कारण वेळेत लक्षणं समजल्यास आणि कर्करोगाचे निदान झाल्यास या जीवघेण्या आजारावर मात करता येते. खरं तर या आजाराची लक्षणं ही सर्व सामान्य आजाराच्या लक्षणासारखीच असतात त्यामुळे सर्वसामान्य लोक याकडे दुर्लक्ष करतात. पण आपलं शरीर आपल्याला कायम शरीरात होणाऱ्या बदलाबद्दल इशारा देत असतो. पण त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगलं असतं. कॅन्सरचं एक असंच साधारण लक्षणं आहे जे सहसा लोकांच्या लक्षातही येतं नाही की हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने कॅन्सरसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार रात्री येणारा घाम हे कॅन्सरचं लक्षणं असू शकतं. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका. उन्हाळ्यात रात्री अनेकांना घाम येतो ही सर्वसाधारण बाब आहे. पण जर झोपताना तुम्हाला खूप घाम येत असेल आणि उशी आणि चादर ओली होत असेल तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकतं. तुम्ही सकाळी उठल्यानंतर उशी आणि चादरी ओल्या झाल्या आहेत तर याकडे दुर्लक्ष करु नका. ताबडतोब डॉक्टरांकडे आपल्या आरोग्याची तपासणी करु घ्या.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की कॅन्सर आणि जास्त घाम यांच्या का संबंध आहे. तर शरीरात संसर्ग झाला असल्याने या रुग्णांना जास्त घाम येतो. कारण संसर्ग झाल्यामुळे शरीराचं तापमान वाढलेलं असतं. कॅन्सर हा इम्यून रिस्पॉन्सला ट्रिकर करतो. या परिणाम शरीरात सूज आणणाऱ्या पदार्थांचं प्रमाण वाढून शरीराचे तापमान वाढतं आणि तुम्हाला घाम येतो. अनेक वेळा कॅन्सर रुग्णांवर जेव्हा उपचार सुरु होतो. त्यावेळी या उपचारादरम्यान शरीरात हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात, त्यामुळेही या रुग्णांना जास्त घाम येतो. कॅन्सरचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जास्त घाम येतो म्हणजे कुठला कॅन्सर झाला असेल. तर कॅन्सर रिसर्च यूके यांच्यानुसार रात्री झोपेत तुम्हाला जास्त घाम येतं असेल तर तुम्हाला हाडांचा कॅन्सर झाल्याची भीती आहे. तसं तर हाडांच्या कॅन्सरशिवायही इतर प्रकारच्या कॅन्सरमध्येही घाम येतो. पण जर तुम्हाला झोपेत जास्त घाम येतं आहे, सतत हाड दुखतं आहेत. तर हे हाडांच्या कर्करोगाचे सामान्य लक्षण आहेत. कधी कधी त्या रुग्णांना हलक्या हलक्या वेदनाही असतात. त्या पुढे जाऊन अधिक तीव्र होतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम