शेंबड्या पोरग पण सांगणार राष्ट्रवादी कुणाची ; जयंत पाटील !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑक्टोबर २०२३

गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांनी भाजप- शिवसेना यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी ही आमचीच असा दावा अजित पवार गटाने केला आहे. यामुळे सध्या कोर्टाकडून याबाबत निर्णय घेणार असून अजूनही वाद सुरु आहेत. दरम्यान राष्ट्रवादी ही शरद पवार यांचीच असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राष्ट्रवादी कोणाची हा वाद सुरु आहे. परंतु राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेल. त्यामुळे राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे; असं मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

निवडणूक आयोगाने यात बदल केला, तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, असं म्हणत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाण साधला. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे. जयंत पाटील हे मावळमध्ये जनरल मोटरच्या कामगारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मावळचे आमदार सुनील शेळके हे सत्तेत जाऊन बसलेले आहे. इथे बोलण्यापेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांना चार खडे बोल सुनावले असते तर ही वेळ कामगारावर आली नसते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम