शिक्षकांसाठी शिंदे-भाजप सरकारने दिले 1160 कोटी रुपये -शुभांगीताई पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ नोव्हेबर २०२२ मागील गेल्या सुमारे 15 वर्षांपासून राज्यातील विनाअनुदानित-अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वेतनाच्या प्रलंबित प्रश्नाला अखेर शिंदे-भाजप सरकारनेच न्याय दिला आहे. अशी माहिती शुभांगीताई पाटील यांनी दिली आहे.

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने मंत्री मंडळात विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतना साठी 1160 कोटी रुपये अनुदानास तत्त्वतः मंजुरी देऊन विनाअनुदानित शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे.

मागील गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेने राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शिक्षकांसाठी अनुदान मिळवण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन करून सतत ही मागणी लावून धरली होती, व गेल्या सुमारे वर्षभरापासून अघोषित शिक्षक महासंघ याच्या माध्यमातून आझाद मैदानावर सकाळी आंदोलन सुरू होते, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटना मिळून स्थापित शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांनी मागील36 दिवसां पासुन मुंबई आझाद मैदानावर तीव्र आंदोलन सुरू केले होते.

राज्यातील हजारो शिक्षक प्रत्यक्ष मैदानावर बसून होते तर मैदानाबाहेर मंत्री स्तरावर राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांचा पाठपुरावा सुरू होता त्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व खानदेशी नेते माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता काल देखील माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या प्रयत्नाने सदरचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येऊन रक्कम रुपये 1160 कोटी ला मंत्रिमंडळात तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील 60000 शिक्षकांना याचा लाभ होणार असून मागील पंधरा वर्षापासून विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या बिनपगारी शिक्षकांना यामुळे वेतन मिळणार आहे,
शिंदे भाजप सरकारच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी ताई पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब तसेच शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब व शिक्षकांसाठी लढणाऱ्या सर्व संघटना व प्रत्यक्ष मैदानावर बसणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहेत

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम