शिंदे सरकारने केली डील : एअर इंडियाची इमारतीची केली खरेदी !
बातमीदार |८ नोव्हेबर २०२३
राज्य सरकारने नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची प्रतिष्ठित इमारत खरेदी केली असल्याची माहिती समोर येत आहे. सरकार मंत्रालय विस्तारात रूपांतर करण्याचा विचार करीत आहे. या इमारतीची मालकी असलेल्या एआय अॅसेट्स होल्डिंग लिमिटेडने राज्य सरकारच्या 1,600 कोटी रुपयांच्या ऑफरला सहमती दर्शवली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती आणि महाराष्ट्र सरकारला इमारत विकत घेण्यासाठी प्राधान्य देण्याची विनंती केली होती. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला सांगितले होते की त्यांच्या मते या इमारतीची किंमत 2,000 कोटींहून अधिक आहे. राज्य अधिकाऱ्याने सांगितले की, सरकारला एअर इंडियाकडून सुमारे 300 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याची गरज आहे. अधिकाऱ्याने सांगितले की फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात इमारतीसाठी बोलणी सुरू केल्यानंतर, एमव्हीए सरकारच्या अंतर्गत 2021 मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली, परंतु कोणताही करार अंतिम झाला नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम