शिंदे सरकार तीन महिन्यात जाणार ; राऊतांनी सांगितले कारण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  राज्यातील सत्तासंघर्षवर नुकताच न्यायालयाने निकाल दिला आहे. तर आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टानं शिंदे-फडणवीसांना उघडं पाडल्याचे वक्तव्य केलं आहे.

फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करु शकत नाही हे न्यायालयानं सांगितलं आहे. मग तुम्ही कसले पेढे वाटताय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचे राऊत म्हणाले. अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत, आदेश पाळाल तर अडचणीत याल. त्यांचे सर्व आदेश बेकायदेशीर आहेत असे राऊत म्हणाले. आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंचे काहीही चुकले नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

अधिकाऱ्यांनी आणि प्रशासन पोलिसांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत. कारण हे सरकार बेकायदेशीर असल्याचे राऊत म्हणाले. आमचे व्हीप कायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे संजय राऊत म्हणाले. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्ष तयार करतो. फुटलेला गट मूळ पक्षावर दावा करु शकत नसल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळं हे सरकार बेकायदेशीर असल्याचे राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी संपूर्ण सरकार बेकायदेशीर ठरवलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अनेक पक्ष बदललेले गृहस्थ आहेत. काँग्रेसमध्ये होते, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये होते, आता भाजपमध्ये होते. पुढे ते कुठं असतील ते मला माहित नसल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यांना कोणतही राजकीय स्थैर्य नाही. त्यांना सत्ता हा आधार असल्याचे राऊत म्हणाले. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निवाड्यानुसारचं न्याय करावा लागेल असे राऊत म्हणाले.
सुरुवातीची परिस्थिती समोर ठेऊन निकाल द्यावा लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. त्यामुळं कुणीही काहीही म्हणलं तर सर्वोच्च न्यायालयाची लक्ष्मण रेषा ओलांडता येणार नाही. त्यामुळं हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. या सरकारचा मृत्यू अटळ असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यामुळं या राज्यातील प्रशासन आणि पोलिसांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नयेत नाहीतर तुम्ही अडचणीत याल असे राऊत म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम