
CBSE चा दहावीचा निकाल जाहीर ; पहा निकाल इथे !
दै. बातमीदार । १२ मे २०२३ । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यंदा ३८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 साठी नोंदणी केली आहे त्यापैकी 21,86,940 विद्यार्थ्यांनी देशभरात 10वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. CBSE ने 5 एप्रिल 2023 रोजी 10वी आणि 12वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात आली होती. मागील काही दिवसांंपासून विद्यार्थी या निकालाची वाट पाहात होते.
CBSE 10वी बोर्ड परीक्षा 2022 साठी एकूण 21,09,208 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 20,93,978 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण उपस्थितांपैकी 19,76,668 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना https://cbseresults.nic.in/ या लिंकवर क्लिक करून त्यांच्या निकाल पाहाता येणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम