शिंदे गटातील मंत्र्याला कोरोनाची लागण !
दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ । २०१९ मध्ये जगभर कोरोनाचे मोठे संकट आले होते. त्यानंतर कशीबशी परिस्थिती नियंत्रणात आली होती. आता पुन्हा एकदा कोरोनाचे राज्यात रुग्ण सापडू लागले आहेत. त्यातच शिंदे गटाच्या मंत्रिमंडळातील मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे.
यामुळे आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचे दिसून येते आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसतोय. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. याबाबत शंभूराज देसाई म्हटले की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे.
माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो, असेही ते म्हणाले. सध्या राज्यात रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यामुळे धोका अजूनही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांना देखील कोरोना झाल्याने ते देखील विश्रांती घेत आहेत. यामुळे आता सर्वांनी काळजी घ्यावी लागणार आहे. मास्क वापरण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम