शिंदेंच्या मंत्र्यांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ ।  शिवसेनेतून जयदत्त क्षीरसागर, राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी बाहेर काढले नाही. ज्यावेळी आपली वेळ येते, तेव्हा किती सक्षम आहे हे दाखवण्याचे काम केले. हॉस्पिटलमध्ये असताना मिटिंग झाल्या असे सांगतात. पण हॉस्पिटलमध्ये असाताना किती मिटिंग झाल्या हे मलाही कधीतरी सांगावे लागेल, असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

दरम्यान उदय सामंत पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सोमवारी झाला नाही, आजही झाला नाही. उद्या किंवा परवा कधीतरी होईल. पण लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार होईल. तर त्यांच्यावर टीका करत असताना तत्वाला विरोध आहे समजू शकतो. पण वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे चांगले नाही.

मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे राजकारण जवळून पाहिले आहे. महाराष्ट्रातील विभागनिहाय माहिती त्यांच्याकडे आहे. कोणते आमदार कुठून आले आहेत हे संख्येनुसार माहितेय. त्यामुळे हे तिघेही अतिशय समन्वय आणि समतोलाने खातेवाटप करतील आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. एखादा वरिष्ठ लोकप्रतिनिधी असेल तर त्याला चांगलं खाते मिळावे असा आग्रह असू शकते, पण ते मिळेलच असे नाही. उदय सामंत म्हणाले की, कितीही दौरे केले तरी महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त खासदार महायुतीचे निवडून येणार आहेत आणि 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे निवडून येणार आहेत. मला असे वाटते की स्वतःकडे असलेले आमदार आणि कार्यकर्ते टिकवण्याकरता हा खटाटोप सुरू आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम