ब्रेकिंग : सप्तश्रृंगी गड घाटात बस कोसळली घाटात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ ।  नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सप्तशृंगगड ते खामगाव (बुलढाणा) बस थेट दरीत कोसळली आहे. यात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांचेवर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

बस सप्तशृंगीगडावरून खामगावच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच सप्तशृंगी देवी ट्रस्ट, पोलिस प्रशासन, ग्रामस्थ, आपत्ती व्यवसथापन घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना वणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृत महिलेच्या परिवाराला एसटी महामंडळाकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम