केद्रीय मंत्रीमंडळात शिंदेंच्या शिवसेनेला दोन मंत्रीपद ; ही नावे चर्चेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जून २०२३ ।  राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलेला असतांना आता याला हिरवा कंदील केद्रातून मिळाला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील व भाजपमधील अनेक आमदारांनी मंत्रीपद मिळावे यासाठी मोठी फिल्डिंग देखील लावलेली दिसून येत आहे. तर येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता दाट असून राज्य मंत्रिमंडळासोबतच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना देखील वेग आला आहे. केंद्रात देखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्री आशी दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राज्य मंत्रिपदासाठी खासदार प्रतापराव जाधव व भावना गवळी यांची नाव चर्चेत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं विलंब झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पुढील आठवडयात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावे?
भरत गोगवले, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, बच्चू कडू, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील शिवसेनेच्या या आमदारांना मंत्रिपद मिळण्यची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम