पवारांच्या षटकारवर फडणवीस क्लिन बोल्ड ; राऊतांची जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जून २०२३ ।  राज्यात दोन दिवसापासून भाजप व राष्ट्र्वादित पहाटेच्या शपथविधीवर मोठे आरोप प्रत्यारोप होत आहे. यात आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले असून पहाटेच्या शपथविधीमागे नेमके काय राजकारण होते?, याचा खुलासा आज पत्रकार परिषदेत केला.

2019 मध्ये भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याबाबत शरद पवारांशी चर्चा झाली होती. त्यांनी सुरुवातीला त्याला समंती दिली. मात्र, शपथविधीच्या 3-4 दिवस अगोदर निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, याबाबत शरद पवारांनी जे काही सांगितले आहे ते सत्य आहे. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवारांनी एकाचवेळी टाकलेली ती गुगली आणि सिक्सर दोन्हीही होते. शरद पवारांच्या या गुगलीवर देवेंद्र फडणवीस व त्यांचा भाजप पक्ष पुरता क्लिन बोल्ड झाला.

संजय राऊत म्हणाले, 2019च्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ही राष्ट्रपती राजवट कशी उठवावी, याबाबत आम्ही सर्वच जण चिंतेत होतो. शरद पवार, उद्धव ठाकरे आम्ही सर्वजण याबाबत वारंवार चर्चा करत होतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तीन पक्षांचे बहूमत मानणार नाहीत, वेळकाढू पणा करतील, केंद्र सरकार व राज्यपाल आम्हाला झुलवत बसतील, अशी आम्हाला खात्री होती. संजय राऊत म्हणाले, 2019मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट उठवण्याबाबत आम्हा नेत्यांमध्ये वारंवार चर्चा होत होत्या. तेव्हाच शरद पवारांनी गुगली टाकली आणि भल्या पहाटे बातमी आली की राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली. पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांनी टाकलेली गुगली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस क्लिन बोल्ड झाले. शरद पवारांना सजून घेण्यासाठी भाजप नेत्यांना 100 वर्षे लागतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम