शिवसेनेचा ठाकरे गटाला जोरदार धक्का ; २५ माजी नगरसेवक दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३० ऑगस्ट २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एकामागून एक धक्के देत असून नुकतेच ठाकरे गटाचे विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक आणि संजय व सुनील राऊत यांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. विक्रोळीच्या माजी नगरसेवकाला पक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत बंधूंना ‘जोर का झटका’ दिला असल्याची चर्चा आहे.

उपेंद्र सावंत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी उपेंद्र सावंत म्हणाले, गेली दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या भागाचा विकास करता येणे शक्य होत नसेल तर कसे चालणार. आपल्या प्रभागातील विकासकामांना गती मिळावी यासाठी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उपेंद्र सावंत यांच्या येण्यामुळे शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या 33 झाली असून त्यातील 25 हे ठाकरे गटाचे आहेत. ज्या लोकांनी त्याना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणूक घेण्याची हिम्मत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, मात्र उबाठा गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे. उलट शिवसेनेची निवडणूक घेण्याची पूर्ण तयारी असून कधीही निवडणुका लागल्या तरीही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम