शिवसेनेच्या वर्धापन दिली शिंदे गटाला लागणार लॉटरी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जून २०२३ ।  राज्यात गेल्या काही महिन्यापासून मंत्री मंडळाचा विस्तार न झाल्याने अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यावर दिल्लीत निर्णय घेण्यात आला असून येत्या १९ जूनच्या आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वी किंवा राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी केंद्राच्या कॅबिनेटचा विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

BJP add

शिवसेनेच्या दोन खासदारांनी केंद्रामध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. दीड तास चाललेल्या या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

या बैठकीमध्ये राज्यातल्या वादग्रस्त मंत्र्यांना, ज्यांनी सरकारला अडचणीत आणलं त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातल्या मंत्र्यांचं रिपोर्टकार्ड घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाचं गिफ्ट मिळू शकतं.

१९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी शक्यता आहे. काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. काल पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील कार्यक्रम आटोपून दिल्लीला रवाना झाले. रात्री १० वाजता उभय नेत्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तिघांमध्ये दीड तासांहून अधिक वेळ चर्चा झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार मिळत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम