शिवरायांची वाघनखं ‘या’ दिवशी येणार राज्यात !
बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. शिवरायांनी ज्या वाघनख्यांनी स्वराज्यावर आलेल्या अफजलखानाचा कोथळा काढला आणि आदिलशाहीला हादरा दिला ती वाघनखं आता महाराष्ट्रात आणण्याचा मुहूर्त ठरला आहे. येत्या 16 नोव्हेंबर रोजी ती वाघनखं मुंबईमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली.
The historic moment has arrived as the British Government prepares to return the fabled 'Waghnakhe' (#TigerClaw) weapon, the very instrument #ChhatrapatiShivajiMaharaj wielded to vanquish Afzal Khan at the hallowed grounds of Pratapgad Fort.
@PMOIndia @GOVUK pic.twitter.com/RnFaxyPoLX— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 8, 2023
यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. सर्वांना ही वाघनखं पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही वाघनखं ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील त्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग उभारण्यात येईल. सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावरही शेअर केली आहे.
शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही सध्या ब्रिटनमध्ये असून ती परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. ही तलवार 2024 पर्यत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगदंब तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजेची तलवार असल्याची माहिती इतिहासात नोंद आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम