शिवरायांचे चरित्र व कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल – प्रा. डॉ. अविनाश भंगाळे

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

     छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श आहे. त्याचबरोबर त्यांची राज्यव्यवस्था संपूर्ण जगासाठी आदर्शवत आहे. शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले. आपली राज्यव्यवस्था सामान्य माणसासाठी आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. सर्वत्र अन्याय करणारे राजे राज्य करीत असताना ‘रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये’ असे आपल्या सैनिकांना बजावणारे शिवराय हे जगातील एकमेव राजे होते. शिवरायांनी गाजवलेले कर्तृत्व असामान्य होते. म्हणून त्यांना दैवी अवतार समजणे चुकीचे ठरेल. ‘एका असामान्य माणसाने गाजविलेले असामान्य कर्तृत्व’ या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिल्यास त्यांचे चरित्र व कार्य यांचे योग्य मूल्यमापन करता येईल. असे प्रतिपादन प्रा. डॉ. अविनाश भंगाळे यांनी केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांची उपस्थिती होती.

     सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. एस. डी. भैसे, डॉ. डी. एम. मराठे, प्रा.एम. डी. बिर्ला, डॉ. एन. व्ही. चिमणकर, डॉ. एस.जी. शेलार, प्रा. जी. एस. अहिरराव, डॉ. सी. एस. पाटील, प्रा. एस. एम. झाल्टे, प्रा. एस. ए. कोळी, डॉ. डी. एच. तांदळे, प्रा.डी. ए. मस्की, डॉ. बी. एस. भालेराव, डॉ. सचिन हडोळतीकर, डॉ. अतुल देशमुख, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रदीप वाघ, डॉ. मंजुश्री जाधव, डॉ. गजानन चौधरी, प्रा. ज्योती नन्नवरे, प्रा. प्रवीण देसले यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जयंती-पुण्यतिथी समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील यांनी केले तर प्रा. रचना गजभिये यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम