भाजपला धक्का : अभिनेत्रीने दिली ट्विटद्वारे पक्षाला सोडचिठ्ठी

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ ऑक्टोबर २०२३

प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेत्री व तामिळनाडूच्या भाजप नेत्या गौतमी तडिमल्ला यांनी सोमवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. गत २५ वर्षांपासून भाजपशी असलेले नातेसंबंध संपुष्टात आल्याचे स्पष्ट करत अभिनेत्रीने पक्ष सोडण्याची घोषणा केली. इतर काही लोक व भाजपमधीलच एका वर्गाने माझी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिल्याचा आरोप यावेळी तडिमल्ला यांनी ट्विटद्वारे केला.

२०२१ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन पक्षाने मला दिले होते. मात्र, ऐनवेळी माझे तिकीट कापले. उमेदवारी नाकारल्यानंतरही मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. असे असताना पक्षातील एका व्यक्तीने पैसा, संपत्ती व कागदपत्रांद्वारे माझी फसवणूक केली. त्यामुळे मोठ्या जड अंतःकरणाने व निराशेतून भाजप सोडत असल्याचे गौतमी यांनी सांगितले. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करणारे ट्विट तडिमल्ला यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पक्षाचे तामिळनाडू प्रदेशचे प्रमुख के. अन्नामलाईसह आणखी काही लोकांना टॅग केले आहे. माझी फसवणूक झाल्यानंतरही पक्षाने व नेत्यांनी आपल्याला कोणतीही मदत केली नसल्याचे गौतमीचे म्हणणे आहे. याप्रकरणी आपण पोलिसांमध्ये तक्रार दिल्याचे सांगत राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन व न्यायव्यवस्थेकडून न्याय मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम