राज्यात अंड्यांचा तुटवडा ; हिवाळ्यात दर वाढले !
दै. बातमीदार । १९ जानेवारी २०२३ । राज्यात हिवाळ्याची थंडी जोरदार प्रमाणात वाढल्याने उत्तरेतल्या या बर्फवृष्टीनं काही जणांच्या ताटातले पदार्थ महाग झाले आहेत. आता आम्ही असं का बोलतोय. तर त्याला कारण आहे.. अंड्यांचे वाढलेले दर.. अंड्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. डझनभर अंड्यांसाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत. कारण, महाराष्ट्रात अंड्याच्या तुडवडा निर्माण झाला आहे. राज्यात तब्बल एक कोटी अंड्याचा तुटवडा आहे. त्यामुळे अंड्यांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहेत. दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश असणाऱ्या घरामध्ये मात्र या महिन्याचं बजेट कोलमडले आहे.
आज महाराष्ट्रात जवळपास एक कोटी अंडी तुटवडा निर्माण झाला आहे. आणि हाच तुटवडा भरुन काढण्यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूमधून अंडी आयात केली जात आहेत. राज्यातील अंड्याचा तुटवडा काही पहिल्यांदाच निर्माण झालेला नाहीय. त्यामुळे पशुसंवर्धन विभागने प्रत्येक जिल्ह्यात विविध योजना राबवण्याचा प्रस्ताव पाठवला राज्य सरकारला दिलाय. एक हजार पिंजऱ्यांसह 21,000 रुपयांच्या सवलतीच्या दरात 50 पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्या उपलब्ध करून देण्याची मागणी पशुसंवर्धन आयुक्तांनी केली आहे.
गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यात अंड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आधीच महागाईमुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे, त्यात अंड्याच्या वाढलेल्या दरांमुळे खिशाला आणखी चाप बसत आहे. गेल्या महिन्यात अंडी पन्नास ते साठ रुपये डझन मिळायचे, तर तेच आता 80 ते 90 रुपयांना मिळात आहेत. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागानं पाठवलेला प्रस्ताव सरकारकडून मान्य होतो का? त्याचबरोबर अंड्याचे उत्पादनवाढीसाठीचा नवा प्रयोग किती उपयोगी पडतो का? हेही पहावं लागेल. अंड्यांच्या दरवाढीचा परिणाम फक्त ग्राहकांनाच नाही तर अनेक व्यवसायांवर देखील होतो आहे. जसे की, केक शॉप, बेकरी व्यवसाय, हॉटेल व्यवसाय यांना दरवाढीचा फटका बसणार आहे. या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात अंड्यांचा वापर केला जातो. अंड्याच्या दरवाढीचा परिणाम समाजातील 90% लोकांवर दिसून येतो. अंड्यांच्या वाढलेल्या भावांमुळे पोल्ट्री व्यवसाय जरी तेजीत असला तरीही इतर व्यवसायांवर याचा परिणाम होत होत आहे. त्यामुळे अंड्यांच्या वाढत्या भावावर नियंत्रण आणावे अशी मागणी सर्वसामान्य देखील करत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम