राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र आल्यास काही अडचण नाही ; अजित पवार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ ऑक्टोबर २०२२ । राज्यात दिवाळी सणानिमित्त राजकीय फटके बाजी सुद्धा दोन दिवसापासून पाहायला मिळत आहे. अशातच अजित पवार यांनीही शिंदे व ठाकरे भेटी दरम्यान भाष्य केले आहे. राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकत्र आल्यास काहीही चुकीचं नाही. त्यामध्ये काही अडचण नाही, असं अजित पवार यांनी म्हंटलं आहे. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब बारामतीत आहे. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

दादरमधील शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकाच मंचावर होते. तेव्हापासून युतीच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना अजित पवार म्हणाले की, दिवाळीचा सण आहे. करोनानंतर दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात चुकीचं काय? राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील तर त्याच्यात चुकीचं काय आहे?, असं अजित पवार म्हणाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम