भाजपला भीती वाटत असल्याने…पटोलेंचे जोरदार टीकास्त्र !
बातमीदार | १० ऑगस्ट २०२३ | देशात कॉंग्रेस नेते राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय वाद अवघा देश पाहत आहे. संसदेत सुरु झालेल्या राहुल गांधी यांच्या गदारोळावरून भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली होती तर याला प्रतिउत्तर म्हणून राज्यातील कॉंग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले कि, काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांना जोडण्याचे काम करीत असल्याने विद्वेषी सरकारकडून त्यांच्या विरोधात कायम षडयंत्र केले जातात. त्यांच्यावरील किसचा आरोपही असाच विद्वेषी षडयंत्राचा भाग असल्याची टीका देखील त्यांनी केली.
केंद्र सरकारविरोधात क्रांती दिनी काँग्रेस तसेच विविध आदिवासी संघटनांतर्फे बुधवारी (ता. ९) मोर्चा काढण्यात आला. त्यास श्री. पटोले उपस्थित राहिले. त्यानंतर दुपारी ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार डॉ. शोभा बच्छाव, ॲड. आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. श्री. पटोले म्हणाले, की काँग्रेसचे नेते राहुल गांधी देशभर फिरून लोकांना जोडण्याचे काम करीत आहेत. त्याची भाजपला भीती वाटत असल्याने त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले गेले. सत्ताधारी भाजपकडून विद्वेषाचे राजकारण सुरूच आहे. गुन्हा दाखल करून आधी त्यांची खासदारकी घालविण्याचा प्रयत्न झाला, आता न्यायालयाने झटका दिल्यावर वेगवेगळे आरोप करून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरूच आहे. मात्र, यातूनही राहुल गांधी सुखरूप बाहेर पडतील. मणिपूरमध्ये अत्याचाराचा आगडोंब उसळला आहे. मात्र, पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाहीत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम