श्रीमती रक्षाताई खडसे यांची भारत सरकारच्या मंत्रिपदी निवड – शपथ विधीसाठी रवाना

बातमी शेअर करा...

जळगाव – नवनिर्वाचित श्रीमती रक्षाताई खडसे यांची भारत सरकारच्या मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे. या शपथ विधीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे देखील उपस्थित राहणार असून ते देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.

श्रीमती रक्षाताई खडसे यांची लोकसेवेत कार्यकुशलता आणि जनसेवेसाठी कर्तव्यदक्षता हे त्यांच्या निवडीचे कारण ठरले आहे. त्यांची या पदावर निवड होणे हा जळगाव जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे.

लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भारतसरकारच्या मंत्रिपदी निवड झाल्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम