…म्हणून पंकजा मुंडेंचे नुकसान होतेय ; मंत्री पाटील !

बातमी शेअर करा...

कृषीसेवक | २४ नोव्हेबर २०२३

राज्यातील भाजपने पंकजा मुंडे यांची पक्षात खच्चीकरण सुरू असल्याच्या चर्चा नेहमी रंगतात. त्यातच पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं आहे.

मंत्री पाटील म्हणाले कि, “पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की, त्या शिंकल्या आणि हसल्या तरी बातमी होती. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे,” असा दावा त्यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंनी डोळ्यांना चष्मा लागल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याचं सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम