तरुणांना मोठी संधी ‘या’ महापालिकेत मिळणार नोकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक तरुण बेरोजगार असून त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची

शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर

भरले जाणारे पद – कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी,

शाखा अभियंता
पद संख्या – 22 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-३
नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर

भरतीचा तपशील

पद पद संख्या
कार्यकारी अभियंता 01
उप अभियंता 05
कामगार अधिकारी 01
आगार व्यवस्थापक 01
सहाय्यक आगार व्यवस्थापक 01
प्रशासकीय अधिकारी 01
उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी 01
शाखा अभियंता 10

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्यावर पाठवावे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम