दै. बातमीदार | २७ सप्टेंबर २०२२ | शेगाव येथील अग्रवाल समाजाच्या माध्यमातून प्रतेक कुटुंबाचा विकास व्हावा समाजामध्ये एकत्रीकरण असावा.समाजाच्या विकासासाठी अग्रबाधवानी पुढाकार घ्यावा युवा पीढी सुसंस्कृरीत ठरावी. समाज हीतासाठी विविध उपक्रमे राबवावी समाज संघटीत अधिक मजबुत व्हावे याकरिता सर्वानी समाजाच्यावतीने सहकार्य करावे जेनेकरुन समाजामध्ये ऐक ईतीहास घडेल. महाराजा अग्रसेन याच्या विचारावर समाजाने मार्गक्रमण करावे प्रतेकाने विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतीपादन मा. नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल यानी सर्व अग्रवाल समाज बाधवाना दीला.
दि. 26 सप्टेंबर रोजी शेगाव येथे श्री महाराजा अग्रेसेन जंयती उत्सव साजरा करण्यात आला सकाळी 9 वाजत अग्रवाल नवयुवक मंडळ व सर्व समाज बाधवाच्यावतीने शहरातून भव्य मोटरसायकल रँली काढण्यात आली. रँली मध्ये विविध चोकातील अग्रेसेन महाराज, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, गाडगे बाबा या महापुरुषांच्या पुतळ्याचे पुजन व माल्यार्पन करुन अभीवादन करण्यात आले जय अग्रसेन, जय अग्रोहा,च् या जयघोशातप्रमुख मार्गाने रँली काढण्यात आली.रँली मधील समाजबाधवाना अग्रेसेन सहकारी पत संस्थाच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. यानंतर सायंकाळी 4 वाजता श्री अग्रेसेन भवन येथुन भव्य शोभायात्राला सुरुवात करण्यात आली शोभायात्रेत श्री. महाराज अग्रेसेनजीच्या पुतळ्याला रथामध्ये सजवून शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत अग्रवाल नगर समीती चे अध्यक्ष डॉ हरीश सराफ,उपाध्यक्ष सुरेश जयपुरीया,सचिव जितेन्द अग्रवाल(साफरावाला), सहसचिव कन्हैया,संजय सलामपुरीया, रितेश अग्रवाल, गोपाल चोधरी, मयुर अग्रवाल, पत्रकार सतीश अग्रवाल, मनिष टिबडेवाल, सतीश मुरारका, रितेश टेकडीवाल, निखिल कीयाल, लखन अग्रवाल, विजय केडीया, योगेश जयपुरीया, मोहन सराफ, माजी नगराध्यक्ष शरदसेठ अग्रवाल, राजुसेठ अग्रवाल, पप्पू अग्रवाल, विजय पाडीया, जगदीश नारनोलीया, जुगलकीशोर साफरावाला,महिला मंडळच्या अध्यक्ष सौ.उर्मिला अनिलजी अग्रवाल, उपाध्यक्ष सौ. उमा आनंदजी धानुका, सचिव सौ. सिमा मनिषजी टिबडेवाल, सहसचिव सौ. प्रीती मनिषजी टिबडेवाल, आदी महीला व युवकांनसह जयंती उत्सव समीतीचे पदाधिकारी याच्यासह समस्त अग्रवाल समाज बाधंव शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शोभायात्रेत श्री. अग्रेसेन महाराजाच्या पुतळ्याचे ठीक ठीकाणी अनेक समाज बांधवांच्यावतिने स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत सहभागी झालेले समाज बाधंवाना महेश्वरी मंडळ समाजाच्या वतीने अग्रसेन चोकामध्ये शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले व शितपेयचे चे वाटप करण्यात आले, मनिष मुक्तीलालजी मोदी सहपरिवाराच्या वतीने सर्व समाज बाधवाचे स्वागत करण्यात आले व पाणी शितपेयाचे वाटप करण्यात आले, खेतान चोक येथे अग्रसेन सहकारी पंत सस्थाच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले, तसेच मार्गाने फीरुन शोभायात्रेचा अग्रेसेन भवन येथे समारोप झाला. रात्री 8 वाजता मुख्य जयंती समारोहाला सुरवात झाली. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शेगाव येथील श्री सुरेशचंद्र राधाकिसनजी गोयनका, श्री गोविंदजी पुरणमलजी चोधरी, श्रीमती सुशिलादेवी बनारसीलालजी अग्रवाल, श्रीमती सरोजदेवी माणीकचंदजी गाडोदीया, याच्यासह अग्रवाल समीतीचे अध्यक्ष डॉ श्री हरीश सराफ,श्री सुरेशचंद्र बनारसीलालजी जयपुरीया, महीला मंडळ अध्यक्षा सौ.उर्मिला अनिलजी अग्रवाल, बहुबेटी मंडळ अध्यक्ष सौ.राखी संजयजी गोयनका याची व्यासपीठावर उपस्थिती होती सर्वप्रथम महाराजा अग्रेसेन याचे पुजन व आरती करण्यात आली यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यानंतर कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात जयंती सत्सवादरम्यान घेण्यात आलेला विविध स्पर्धा मधिल विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.प्रमुख अतीथीयाचा परीचय राहुल अग्रवाल,यानी करुन दीला.तर समारोहाचे संचालन महेंद्र अग्रवाल, तर आभार सौरभ टिबडेवाल अग्रवाल यांनी मानले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम