सुंदर दिसण्यासाठी उर्फीने केले असे काही !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  गेल्या वर्षभरापासून सातत्याने सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असलेली टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. ती तिच्या फॅशन सेन्सबाबत सतत प्रयोग करत असते, ज्यामुळे ती नेहमीच चर्चेचा भाग असते. उर्फी तिच्या हेअरस्टाइलमुळे, तर कधी कपड्यांमुळे ट्रोल होत असते.

मात्र, याचा उर्फीला काहीही फरक पडत नाही. ट्रोल्सकडे दुर्लक्ष करून उर्फी तिच्या फॅशन स्टाइलवर लक्ष केंद्रित करत असते. उर्फीने नुकतेच लिप फिलर्स केले आहे, ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फी हिने लिप फिलर्स करून घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला, ज्यामध्ये तिचे ओठ सुजलेले दिसत आहेत. फोटो शेअर करताना उर्फीने लिहिले, ‘हे विचित्र आहे, पण मला सुजलेले ओठ आवडतात. काहीही गंभीर नाही, फक्त फिलर्स पूर्ण केले आहेत.’

उर्फी नेहमीच शाॅर्ट आणि हटके कपडे परिधान करते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अलीकडे उर्फी पाकिस्तानी सूट परिधान करू दिसली होती. उर्फीला सूटमध्ये पाहून चाहत्यांना धक्काच बसला. खरे तर, उर्फीने जांभळ्या रंगाचा सूट परिधान केला हाेता, ज्यासाेबत ग्लाॅसी मेअकप आणि माेठे इअररिंग घालते हाेते. उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच तुफान व्हायरल झाला हाेता. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की,’माझ्या डोळ्यात ऍसिड गेले आहे का? ती मला पुर्ण कपड्यांमध्ये दिसत आहे .’, तर दुसऱ्या युजर्सने लिहिले, ‘कोणी आरतीचे ताट घेऊन या.. आज चमत्कार झाला आहे.’ अशात एकाने कमेंट करत लिहिले, ‘आज किमान तिने चांगले कपडे घातले आहेत, नाहीतर ती रोज कोणता भांग पिऊन असते ते माहीत नाही..’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम