मिथुन चक्रवर्तीच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जुलै २०२३ ।  देशातील प्रत्येक व्यक्तीला आवडणारा अभिनेता म्हणजे मिथुन चक्रवर्तीचे सुद्धा नाव घेतले जाते. याच अभिनेत्याबाबत दुखद बातमी समोर आली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची आई शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे. मिथुन यांचा धाकटा मुलगा नमाशीने ही माहिती दिली. मिथुन यांचे वडील बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

आता त्यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्रही हरपलं आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्व आणि राजकीय जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाचं वृत्त कळताच तृणमुल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर शओक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, ‘मिथुन चक्रवर्ती यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. भगवान मिथुन दा आणि त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी बळ देवो.’

अभिनेते मिथुन सध्या ‘डान्स बांगला डान्स’ च्या १२ व्या सिझनमध्ये जज आहेत.या शो संबंधित लोकही त्यांच्या दु:खात सहभागी झाले आहेत. त्यांच्या करिअरचा सुरुवातीचा काळ खूपच संघर्षमय होता. तेव्हा ते आईवडील आणि बहीण भावांसोबत राहत होते. ते एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात वाढले. ते नेहमी सांगतात की माझ्या आईवडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम