राष्ट्रवादीत फुट नाहीच ; सर्व सांगण्याप्रमाणे होतेय !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । राज्यातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी गेल्या दोन आठवड्यापूर्वी शिंदे व फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे तर त्यानंतर चक्क दोन वेळेस शरद पवारांची भेट सुद्धा झाली असतांना एका बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान(केआरके) यांच्या ट्वीटमुळे भाजप व शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सध्या केआरकेच्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवर केआरकेने ट्वीट केलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांसह बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं चित्र आहे. परंतु, राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं केआरकेचं म्हणणं आहे. केआरकेने याबाबच केलेलं ट्वीट चर्चेत आहे. “NCP मध्ये कधीच फूट पडली नव्हती आणि पडणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता आणि एकच राहील. फक्त बॉसच्या स्पेशल फॉर्म्युलानुसार सगळं काही होत आहे,” असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केआरकेच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 

दरम्यान, अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी सोमवारी१७ जुलै) दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरज पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांच्याबरोबर कसा जाऊ? असं विधान शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम