सोनमला बसला मोठा धक्का ; विचार हि केला नाही अस होणार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जून २०२३ ।  बॉलिवूड क्षेत्रात नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच सोशल मिडीयावर देखील चर्चेत असते. आताही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या बॉलिवूड सेलिब्रेटी ओटीटीमुळे हतबल झालेले दिसत आहेत. चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर घसरण होत आहे. अशातच अभिनेत्री सोनम कपूरलाही मोठा धक्का बसला आहे. कारण तिनं कधी विचारही केला नव्हता की ज्या चित्रपटात ती काम करत आहे तो चित्रपट थेट ओटीटी रिलीजवर प्रदर्शित होईल.

2011 च्या ‘ब्लाइंड’ या कोरियन चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सोनम कपूर एका अंध पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा चित्रपट 7 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. याबाबत सोनमसोबत चर्चा झाली नसून निर्मात्यांनी हा निर्णय स्वतः घेतला आहे. तसेच नीरजा चित्रपटामुळे सोनमचं कौतुक झालं होतं. पण आता तिचा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार नाहीये.

‘ब्लाइंड’ चित्रपटाची OTT वर थेट रिलीज करण्याची घोषणा सोनमसाठी धक्कादायक होती. कारण निर्मात्यांनी तिला सुरूवातीपासूनच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, थिएटर मालक बॉक्स ऑफिसच्या बदललेल्या परिस्थितीत अंध चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अटी मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळे निर्मात्यांकडे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वरूण धवन आणि जान्हवी कपूरचा बावल हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार असल्याच्या बातम्या समजताच प्रेक्षक आश्चर्यचकित झाले होते. कारण हा चित्रपट महागडा असल्याचं सांगितलं जात असून त्याचं बजेट 275 कोटी असल्याचं समजतंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम