पुत्राची केवळ १४ महिन्यात पदवी ! किरीट सोमय्या अडचणीत ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने नियमित नवीन घोटाळा बाहेर काढणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या हे आता एका प्रकरणात अडकताना दिसत आहे. नील यांनी केवळ १४ महिन्यात मुंबई विद्यापिठात पदवी मिळाली आहे.

विशेष म्हणजे याती काहीही चुकीचे नाही. मात्र, ज्या विद्युत गतीने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी मिळाली, त्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नेटकऱ्यांनीही टीकेचे बाण सोडले आहेत. नील सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठात पीएचडी पदवीसाठी जून 2021 मध्ये नोंदणी केली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठी शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर लगेच दीड महिन्यात त्यांची तोंडी परीक्षा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 1 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी दिली. नील सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक एम. ए. खान होते. ते म्हणतात की, नील यांनी पीएचडी पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केल्याची बाब एकतर विद्यापीठाने नमूद केली नाही. त्यांनी मार्च 2020 मध्ये प्रबंध सबमिट केला. त्यात कोरोना लाट आली. त्यांना 2021 मध्ये काही सुधारणा सांगितल्या. त्यांनी त्या करून लगेच वर्षात प्रबंध सादर केला. त्यांनी सर्व प्रक्रियांचे पालन केले. फक्त विद्यापीठाने त्यांच्याबाबत खूपच तत्परता दाखवली.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम