उर्फी जावेद झाली भावूक ! नेमक घडल अस काही वेगळ…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ ऑक्टोबर २०२२ । उर्फी जावेद १५ ऑक्टोबर रोजी त्याचा 25 वा वाढदिवस साजरा करणार आहे. प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आपल्या मैत्रिणींचे प्रेम पाहून उर्फीची भावूक झाल्याचं पहायला मिळालं. याचे स्क्रिनशॉट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

उर्फी कायम बोल्ड लुक, बिनधास्त स्वभाव, बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. मात्र ती खूप कमी वेळा इमोशन झालेली पहायला मिळते. मात्र यावेळी प्री-बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आपल्या मैत्रिणींचे प्रेम पाहून उर्फी भावूक झाली. उर्फी जावेदने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिला जवळच्या व्यक्तींचं प्रेम पाहून अश्रू अनावर झाले. इन्स्टा स्टोरीमध्ये ती मित्रांना केक खाऊ घालताना दिसत आहे. उर्फी जावेद या क्षणी भावूक झाली.

 

 

मित्र आणि चाहत्यांच्या प्रेमानेच उर्फीला रडवले. अन्यथा उर्फी याआधी कधीच एवढी इमोशनल झालेली दिसली नाही. उर्फी 15 ऑक्टोबरला 25 वर्षाची होईल. तीनं या वयातही खूप काही कमावलं आहे. तिची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उर्फी जावेदच्या मार्गात अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी प्रत्येक अडचणीचा सामना केला आणि इ्थपर्यंत पोहचली आहे.

उर्फी जावेदने टीव्ही मालिकांमध्ये आणि बिग बॉस ओटीटीमध्येही आपले कौशल्य दाखवले. बिग बॉस ओटीटीनंतर उर्फीने स्वतःला सिद्ध केले. रोज उर्फी चर्चेत असते. शिवाय तिच्या अतरंगी फॅशनने सगळ्यांना थक्क करत असते. ती आता एक सोशल मीडिया स्टार झाली आहे. सध्या उर्फी तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘हाय ही ये मजबुरी’ या गाण्यामुळे चर्चेत आहे. उर्फी जावेदचे हे गाणे 1974 मध्ये रिलीज झालेल्या ‘रोटी, कपडा और मकान’ या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन आहे. या नवीन गाण्यात श्रुती राणेने तिचा आवाज दिला असून राजेश मंथन यांचे बोल आहेत. हे गाणे सारेगामा म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम