लालबागच्या राजाचं दर्शनासाठी पोहचला सोनू सूद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३

देशभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असल्याने मुंबई देखील मानाचे गणपती पाहण्यासाठी, व दर्शनासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यात खासकरुन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक जण लांबून येत आहेत. विशेष म्हणजे यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश आहे.

आतापर्यंत शाहरुख खान, अदा शर्मा , शिल्पा शेट्टी आणि सनी लिओनी यांसारख्या अनेक कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मात्र, सध्या सोशल मीडियावर अभिनेता सोनू सूद आणि फराह खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या कलाकारांना चक्क धक्काबुक्की करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये हा बाप्पा मंडळातील सदस्यांच्या उर्मट वागण्यामुळे आणि दर्शनासाठी करण्यात येणाऱ्या भेदभावामुळे चर्चेत येत आहे. एकीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक लांबच्या लांब रांगा लावत आहेत. तर, दुसरीकडे काही लोकांना VIP दर्शन दिलं जात आहे. त्यामुळे करण्यात येणाऱ्या या भेदभावामुळे अनेक भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. यामध्येच अभिनेता सोनू सूद , फराह खान, मानुषी छिल्लर शेखर सुमन आणि स्मृती इराणी यांसारख्या कलाकारांनी VIP रांग सोडून सर्वसामान्यांसोबत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेतलं. परंतु, यावेळी त्यांना प्रचंड मोठ्या गर्दीचा आणि धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम