क्रूरता : पत्नीच्या गुप्तांगात मिरची टाकून पतीने केला खून !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २७ सप्टेंबर २०२३

पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशयाच्या कारणाने खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पतीला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारात रहिवासास असलेल्या राजेश जगन पावरा (बारेला, वय-२८) हा आपल्या पत्नीसोबत शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्याला होते. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान आरोपी राजेश जगन पावरा याने पत्नी शिवानी हिच्या चरित्रावर संशयावरून हातात मिरचीची पावडर घेऊन गुप्तांगात टाकून तिचा निर्घृन खून केला. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मेहूणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी राजेश जगन पावरा याला अटक केले. याप्रकरणी रामेश्वर रूपचंद राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजेश जगन पावरा बारेला याच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम